सैनिकांचा केला सत्कार
विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. १७ जानेवारी:- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येत असलेल्या वरठी येथील नंबर वन फिटनेस अकॅडमीच्या वतीने सैन्य दिवस नुकताच साजरा करण्यात आला.
15 जानेवारी 1949 मध्ये फील्ड मार्शल के एम करिअप्पा यांनी जनरल फ्रान्सिस भूचर यांच्याकडून भारतीय सेनेची कमान संभाळली होती. म्हणून 15 जानेवारी हे भारतीय स्थल सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. अशी माहिती विद्यार्थिनी श्रुती लांजेवार हिने सांगितली. त्यानंतर माजी सैनिक दिलीप बावनकुळे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सैन्यभरती व पोलीस भरतीसाठी कशाप्रकारे तयारी करावी याबाबतचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात नंबर वन फिटनेस अकॅडमीचे प्रशिक्षक माजी सैनिक दिलीप बावनकुळे, माजी सैनिक विजय पटले, माजी सैनिक शरद पवार, भारतीय सेना मध्ये कार्यरत सैनिक भिवगडे, सैनिक अक्षय चवडे, स्पर्धा परीक्षेचे शिक्षक सानूकुमार तांबेकर यांना शाल व श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता चेतन डांगरे, सचिन फुलबांधे, शैलेश भारतकर, अश्विनी बावनकुळे, अश्विनी भारतकर, स्वाती फुलबांधे यांच्यासह अकॅडमीचे सर्व विद्यार्थी -विद्यार्थीनी सहकार्य केले.