आदेश प्रसाद
शहर प्रतिनिधी महाड
हरीचंद्र धोंडू खेरटकर पोलादपूर मधील आदे गावातील यां अपंग वेक्तीला व्यवसाय करण्यासाठी आणि बबन तुकाराम मालुसरे यांचा बैल आकस्मिक मृत्यू पावला म्हणून त्यांना देखील नवीन बैल घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली, राम आंग्रे यांचा भाताच्या मळणीला शॉर्ट सर्किट मुळे आग लागून संपूर्ण जळून राख झाली आंग्रे यांना वर्षे भर आता कसे काय आपले घर चालणार याची चिंता सतावत होती आमदार भरत गोगावले यानां माहिती मिळताच त्यांनी आंग्रे यांना त्वरित भात खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली, पोलादपूर तालुक्यातील गांजवणे येथील सहदेव रामजी पवार यांचा मुलगा खूप दिवसापासून आजारी आहे त्याला प्रत्येक महिन्याला पुणे येथे उपचारासाठी न्ह्यावे लागते पवार हे हॉटेल मध्ये काम करतात त्यांची परिस्थिती खूपच हालकीची असल्याने त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळेल का असे गावातील काही शिवसैनिक यांनी आमदार गोगावले यांना विचारण्यासाठी पवार यांना घेऊन आले होते, त्या वेळी शिवसैनिकांनी आमदार साहेबांना पवार यांची घरची परिस्थिती आणि आर्थिक अडचण याची माहिती सांगितली असता आमदार गोगावले यांनी ताबडतोब त्या क्षणी पवार यांना त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी त्यांच्या पद्धतीने आर्थिक मदत केली, त्या वेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, संपर्क प्रमुख एकनाथ सुकूम, दासगाव ग्रामपंचायत सरपंच दिलीप (सोनू) उकिर्डे, सरपंच सुकूम इत्यादी उपस्थित होते