भाजपा जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या जि.प.क्षेत्रात १० पैकी ८ ग्रामपंचायती भाजपाकडे….
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
नागभीड (१८ जाने.) – नागभीड तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकी मध्ये भाजपा ने झेंडा रोवला असून तळोधी (बा.) , वाढोणा , पेंढरी , कोथुळणा , विलम, म्हसली, चिंधीचक, जनकापुर, किटाडी(बो.), पळसगाव(खुर्द), बोंड, बाळापुर( बुज.), देवपायली, पारडी ठवरे, कोर्धा, नवेगाव हुंडेश्वरी, चिकमारा, नांदेड, बाळापुर(खुर्द), वैजापुर , कोजबी माल, आकापुर या २२ ग्रामपंचायत वर भाजपाला बहुमत प्राप्त झालेला आहे. तालुक्यात एकूण १८४ सदस्य भाजपाचे विजयी झाले आहे.भाजपा जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या पारडी- बाळापुर क्षेत्रात १० पैकी ८ ग्रामपंचायत वर भाजपाचे वर्चस्व असून मात्र बोंड ग्रामपंचायत मध्ये सौ.कुसुम कोहपरे व अशोक कोहपरे तसेच सौ.निशा सिडाम व जैतराम सिडाम या पतीपत्नी जोडप्यांनी विजय प्राप्त केला.कोजबी माल ग्रामपंचायत मध्ये शेवंताबाई सोमाजी भोयर या ७१ वर्षीय महिला व कु.सोनम नरेश शेंडे या २१ वर्षीय मुलीने भाजपाच्या पँनल कडुन विजयाची मोहर उमटवली.