गोठणगाव येथे भव्य स्टंपर बाल क्रिक्रेट स्पर्धेचे उदघाटन संपन्न
राजअनिल पोचमपल्लीवार
विदर्भ उपसंपादक गडचिरोली
कुरखेडा – कुठल्याही स्पर्धेत खेळतांना सांघीक भावनेने खेळ खेळावे. खेळातुनच खेळाडुंच्या व्यक्तीमत्व चालना मिळते. असे प्रतिपादन युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य चांगदेव फाये यांनी केले.
गोठणगाव जी सी सी क्रिकेट मंडळच्या वतीने स्व प्रशांत दखने व स्व शैलेश नाकतोडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित भव्य स्टंम्पर बाल क्रिकेट स्पर्धा च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रवींद्रजी गोटेफोडे तर उदघाटक म्हणून शेख सर वनपरिक्षेत्र अधिकारी गोठणगाव, प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील गोवर्धनजी नेवारे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बन्सोड सर, रुपेशजी हलामी, कमलाकर मांडवे, मधुसूदन नेवारे,अतिष माकडे, प्रशांत उईके,अतुल मेश्राम, आदित्य कसार, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी रविद्र गोटेफोडे व बन्सोड सर यांनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत प्रथम बक्षिस 25000 हजार रुपये दितीय 15000 हजार रुपये तर तृतीय 10000 हजार रुपये देण्यात येणार असुन व्ययक्तीक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना व्ययतिक पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धात मोठ्या प्रमाणात संघानी सहभाग घेतला असुन स्पर्धा यस्ववीतेसाठी मंडळाचे सदस्य, व खेळाडू प्रयत्न करीत आहे.