विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि.२९ जानेवारी:- आर. एस. युनिक क्लब या संस्थेमार्फत विविध सामाजिक कार्यक्रम वेळोवेळी घेतले जातात. त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भंडाऱ्यातील बाल उदय अनाथालयातील १२ चिमुकल्यांना कपडे वाटप केले. त्यावेळी या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश येळणे, कोर टीम सदस्य ओम चकोले, विवेक गायधने, प्रा.अविनाश नवखरे, प्रशांत वैद्य, ध्रुव मेहर, लांजेवार, सुमित गोंडाने यांच्यासह इतर सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा विविध उपक्रम राबविणा-या संस्थेचे कौतुक करण्यात आले आहे.
…………..