विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा,दि.३० जानेवारी :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण मोहाडी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसिलदार मीनल करनवाल, भा.प्र.से. यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना काळात मोहाडी तालुक्यातील शासकीय सेवेत राहून उत्कृष्ठ कार्य करणार्या अधिकारी व कर्मचार्यांचा गुणगौरव कार्यक्रम याप्रसंगी घेण्यात आला. कोरोना काळात शाळा बंद असल्यातरी आॅनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहण्यासाठी मेहनत घेणारे जिल्हा परिषद हायस्कूल वरठी येथील सहाय्यक शिक्षक बाळासाहेब मुंडे यांचे कोरोना काळात शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेऊन गौरव करण्यात आला.
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी तथा तहसिलदार मीनल करनवाल यांच्या शुभहस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करुन बाळासाहेब मुंडे यांना सन्मानीत करण्यांत आले.
कार्यक्रमात आमदार राजू कारेमोरे, नायब तहसिलदार घनश्याम सोनकुसरे, मोरेश्वर हुकरे, विजय बोरकर यांची व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन नायब तहसिलदार घनश्याम सोनकुसरे यांनी केले. तर आभार नायब नाझर प्रशांत गजभिये यांनी मानले.