आरोग्य प्रबोधिनिचा उपक्रम
संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.6फेब्रुवारी:- शिक्षण विभाग,आरोग्य विभाग व सलाम मुंबई फौंडेशन सहाय्याने आरोग्य प्रबोधिनी संस्थेच्या सहकार्याने गोंदिया जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा अभियान जोमात सुरु आहे.आरोग्य प्रबोधिनिद्वारे आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेल्या नऊ निकषानुसार शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यासाठी शिक्षण विभाग व आरोग्य विभागास सुचना देऊन आढावा घ्यावा व अभियानास आपला पाठिंबा द्यावा यासाठी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना तंबाखू मुक्त शाला संबंधाने निवेदन देण्यात आले.याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे भाऊराव पत्रे व प्रबोधिनीचे डॉ. सूर्यप्रकाश गभने व अन्य मान्यवर उपस्थित होते. भेटीदरम्यान आमदारांनी आरोग्य प्रबोधिनिच्या तंबाखूमुक्त उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व शिक्षण आणि आरोग्य विभागाला निर्देश देणार असल्याचे आश्वासन आमदार चंद्रिकापुरे यांनी यावेळी दिले असल्याची माहिती आरोग्य प्रबोधिनी च्या पदाधिकाऱ्यांनी दिली.आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त वातावरण मिळावे व नविन पिढीत तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरावर निर्बंध यावे यासाठी तंबाखूमुक्त शालांचे मार्गदर्शक निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्वच शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आरोग्य प्रबोधिनिव्दारा सातत्यपूर्ण तंबाखूमुक्त उपक्रमावर कार्य सुरु आहे.आरोग्य प्रबोधिनीद्वारा व्यसनमुक्तीच्या प्रचार-प्रसाराच्या लोकाभिमुख कार्यक्रमांचे सततच आयोजन करण्यात आले आहे.
तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेचे हे आहेत निकष-1.शैक्षणिक संस्थेच्या आवारात ६० x ४५ से.मी. च्या आकाराचा “ तंबाखू मुक्त क्षेत्र “ चा फलक लावलेला असावा.लावलेल्या फलकावर अधिकृत व्यक्तीचे नाव, पद, व संपर्क क्रमांक असावा.2. शैक्षणिक संस्थेच्या प्रवेशव्दारावर ६० x ४५ से. मी. च्या आकाराचा “ तंबाखू मुक्त शाळा “ चा फलक लावलेला असावा.फलकावर अधिकृत व्यक्तीचे नाव, पद व संपर्क क्रमांक असावा.
- शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याबाबतचा पुरावा नसावा. उदा. – सिगारेट, बिडीचे तुकडे, गुटखा, तंबाखूचे पाऊच, भिंतीवर व इतर ठिकाणी थुंकीचे डाग इ.
- तंबाखूच्या दुष्परीणामाबाबतचे पोस्टर व इतर साहित्य शाळेच्या आवारात लावलेले असावे.
- संस्थेत सहा महिन्यातून किमान एक तंबाखू मुक्तीबाबत जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात यावा.
- शैक्षणिक संस्थेने अधिकृत व्यक्ती यांचे नाव, पद, पदनाम व संपर्क क्रमांक याचा उल्लेख फलकावर असावा.7. शैक्षणिक संस्था व परिसरात “तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाचा वापर करण्यास सक्त मनाई आहे” असा नियम शैक्षणिक संस्थेच्या संहितेमध्ये ( Code of Conduct ) समाविष्ट करण्यात यावा.8. शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीपासून १०० यार्ड हे क्षेत्र रेखांकित केलेले असावे.
9.शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारे दुकान नसावे.असे हे नऊ निकष आहेत.