राजअनिल पोचमपल्लीवार
विदर्भ उपसंपादक गडचिरोली
आलापल्ली – 2021 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत आता सरपंच पदाची निवडणूक आज 15 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत आलापल्ली येथे पार पडली यावेळी आलापली ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप सत्ता मिळवण्यात यश संपादन केले आहे.
अहेरी विदानसभा क्षेत्रातील सर्वात मोठी बहुप्रतीक्षित आलापल्ली ग्रामपंचायतीवर सगळ्यांचे नजर होते तिची आज पूर्तता करण्यात आली. सरपंच पदावर शंकर मेश्राम यांची निवड झाली आहे. तर उपसरपंच म्हणून विनोद अकणपल्लीवार यांची निवड झाली आहे. शंकर मेश्राम या सारख्या तरुण उमेदवारांना सरपंचपद मिळाल्याने युवा वर्गात आणि व्यापारी वर्गात मोठा उत्साह आहे.