विजय शेवाळे
तालुका प्रतिनीधी परंडा
परंडा:-आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव चेन्नई येथे सुरू झाला आहे.
जगभरातील तब्बल २९२ खेळाडू या लिलावात नशीब आजमावत आहेत.
यातील आत्तापर्यंत ग्लेन मॅक्सवेलला १० कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली.
आता त्यानंतर ख्रिस मॉरिस आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
त्याला राजस्थान रॉयल्सने तब्बल १६ कोटी २५ लाख रुपयांना विकत घेतले आहे.
त्याला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात चूरस होती. अखेर त्याच्यावर १६ कोटी २५ लाखांची बोली लावत राजस्थानने त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतले.
आयपीएल लिलावात सर्वात जास्त पैसे मिळालेले खेळाडू ख्रिस मॉरिसपुर्वी हा विक्रम भारताच्या युवराज सिंगच्या नावावर आहे.
त्याला २०१५मध्ये दिल्ली डेअरडेविल्सने १६ कोटींना संघात घेतले होते.
ख्रिस मॉरिसची आंतरराष्ट्रीय कारकिर्द-
दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजी ऑलराऊंड अशी ओळख असलेल्या मॉरीसने आफ्रिकेकडून एकूण ४ कसोटी, ४२ वनडे व २३ टी२० सामने खेळले आहे. कसोटीत त्याने १७३ धावा व १२ विकेट, वनडेत ४६८ धावा व ४८ विकेट आणि टी२०मध्ये १३३ धावा व ३४ विकेट्स घेतल्या आहे.
ख्रिस मॉरिसची आयपीएल कारकिर्द-
३३ वर्षीय ख्रिस मॉरिसने २०१३पासून आयपीएलचे तब्बल ७० सामने खेळले असून त्यात त्याने २३.९६च्या सरासरीने ५५१ धावा व ८० विकेट्स घेतल्या आहेत. १५७च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने धावा केलेल्या या खेळाडूने २३.९९च्या चांगल्या सरासरीने विकेट्सही घेतल्य़ा आहेत.