आकाश शामकुरे
तालुका प्रतिनिधी, चिमूर
शंकरपूर (१९ फेब्रु.)- चिमूर तालुक्यातील शंकरपूर या गावात ग्राम पंचायत कार्यालय शंकरपूर व छत्रपती शिवाजी महाराज मंडळ व इतर मंडळाच्या सहकार्याने गावातील विविध ठिकाणी शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवरायांच्या भूमीत जन्माला आल्याचं अहोभाग्य ज्यांना लाभलं ते सर्व आपण भाग्यवान आहोत कारण शिवरायांच्या कर्तृत्व पराक्रमासह सर्व गुणांचा जगाने दखल घेऊन प्रत्येक क्षेत्रात आज त्यांची जयंती साजरी करण्यात येते. त्यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पण साजरी केली जाते. या शिवजयंती च्या निमित्याने आज शंकरपूर या गावातील श्री. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मॉडेल ग्रामसचिवालय शंकरपूर , राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल शंकरपूर, भिसी रोड येथील शिवाजी चौक तसेच इतर ठिकाणी शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली गेली व मसाला भाताचे वाटप करण्यात आला. या जयंती उत्सवावेळी वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज मॉडेल ग्राम सचिवालय शंकरपूर चे नवनिर्वाचित सरपंच श्री.साईश सतिश वारजूकर, ग्रा.पं. उपसरपंच अशोकजी चौधरी, पं. स.चिमूर चे उपसभापती रोषणभाऊ ढोक, ग्राम पंचायत सदस्य निखिलभाऊ गायकवाड, ग्राम पंचायत सदस्य गिताताताई रानडे, ग्राम पंचायत सदस्य सपनाताई घडसे, ग्राम पंचायत सदस्य वंदनाताई सहारे, ग्राम पंचायत सदस्य बेबीबाई डाहारे, ग्रामविकास अधिकारी किरणजी गायकवाड , वासुदेवजी मोहिणकर, आशिषभाऊ चौधरी, रोशनभाऊ मानापुरे, प्रतिकभाऊ मानापुरे, अमितभाऊ शिवरकर, लोकेश बावनकर, आकाश हजारे, संदीप चंदनखेडे, विवेक सहारे, व छत्रपती शिवाजी महाराज मंडळ शंकरपूर चे संपूर्ण सदस्य उपस्थित होते.