पवनी : स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता अवचार उपप्राचार्य पराग टेंभेकर पर्यवेक्षक अजय ठावरे यांनी छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले याप्रसंगी कथाकथन स्पर्धा पोवाडा गीत गायन साभिनयपाठ स्पर्धा व विद्यार्थ्यांची भाषणे झाली covid-19 चे सर्व नियम पाळून शिवजयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी स्पर्धक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होता