तनुज बल्लेवार प्रतिनिधी एटापल्ली
गडचिरोली/एटापल्ली:तालुक्यातील बुर्गी या गावातील भगवंतराव आश्रमशाळा,बुर्गी येथे वाचनालयाची स्थापना करण्यात आली.या कार्यक्रमाचे उदघाटक कमांडेट बाळापूरकर होते ,तसेच यांनी सांगितले की,विद्यार्थ्यांसाठी योग्य माहिती पुरविण्यासाठी वाचनालय हे एक महत्त्वाचे साधन आहे.ग्रंथालय हे गरीब विद्यार्थ्यांसाठी एक स्वर्ग आहे कारण येथे त्यांना कोणत्याही मूल्याशिवाय ज्ञान मिळवण्याचे साधन मिळते .आज मानवांमध्ये जुनी सभ्यता आहे, संस्कृती, इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित इत्यादी माहिती केवळ पुस्तकांद्वारेच शक्य आहे जर विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल तर ग्रंथालय हे एकमेव माध्यम आहे ज्याद्वारे उच्च दर्जाचे पुस्तक सहज उपलब्ध देखील असू शकते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित ब्रजेंद्र कुमार सहायक कमांडंट,सकिलसहाय्यक कमांडंट,कैलाश आलुरे पीएसआय पोलीस मदत केंद्र बुर्गी,ए डब्ल्यू बाबुळे प्राचार्य भगवंतराव आश्रमशाळा स्कूल बुर्गी, एस.डी. मेश्राम प्राचार्य हायस्कूल बुर्गी, वनिता ताई कनके प्राचार्य जिल्हा परिषद हायस्कूल बुर्गी,आदी उपस्थित होते.