रविवार संपुर्ण दिवस पातुर शहरात व तालुक्यात कडक लाॅकडाऊन
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर होणार कार्यवाही
पातूर ठाणेदार हरीश गवळी
किरण कुमार निमकंडे
तालुका प्रतिनिधी
न्यूज-24 मराठी पातूर
तर कोविड-१९ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन व्यवसायीकांवर कलम १८८ नूसार गुन्हा दाखल
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात रविवार कडक लाॅक डाऊनचे आदेश..
दवाखाने,औषधी दुकाने व दूध डेअरी या अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकांनवर होणार कार्यवाही
पातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या पातूर शहरातील नागरिकांना वारंवार सांगितले तरी सुद्धा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाहीची धडक मोहीम राबविण्यासाठी पातूर तहसीलदार दिपक बाजड यांनी कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी पथक तयार केले या पथकांमध्ये पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी,अधिकारी व कर्मचारी यांची टिम कार्यरत असून पातूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरिश गवळी यांच्या आदेशानुसार एकूण पन्नासच्या वर विना माक्स फिरणाऱ्या नागरिकांवर धडक कारवाई करण्यात आली.तसेच तीन रस्त्यावर व्यवसास करणा-यांवर कलम १८८ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.