विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दिनांक 19 फेब्रुवारी:- मराठे बॉईज ग्रुप व ग्राम पंचायत कार्यालय खमारी यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्राम पंचायत परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने डि जे च्या आवाजात शोभायाञा काढुन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते प्रभू फेंडर होते. सरपंच क्रिष्णा शेंडे यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच राजू मोटघरे, महात्मा गांधी तंटा समितीचे अध्यक्ष बबन भोयर, माजी पंचायत समिती सदस्य संजय अहिरकर, लेखक सोमकांत मडामे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश मारवाडे, रजनिश बन्सोड, सामाजिक कार्यकर्त्यां नालीनी काळे, प्रभाकर पवनकर, दिलीप मडामे, सत्यानंद रेहपाडे, तारकेश्वर अहिरकर, विदर्भ ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव विलास केजरकर, चक्रधर शनवारे उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यावेळी माही मोहरकर हिने “एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर” या गाण्याच्या तालावर डान्स केले तर उपस्थित मान्यवरांनी शिवसैनिक होण्यासाठी शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या शिकवणूक वर कटाक्षाने लक्ष दिल्यास खरच शिवसैनिक आणि खरी शिवजयंती साजरी करण्याला अर्थ उरेल असे मार्मिक मत सामाजिक कार्यकर्ते प्रभू फेंडर यांनी केले. त्यावेळी संपूर्ण खमारी ग्राम येथे डि जे च्या आवाजात शोभायाञा काढण्यात जय भवानी जय शिवाजी, महात्मा गांधीकी जय, डॉ. आंबेडकरकी जयच्या गजरात दुमदुमली आहे.
कार्यक्रमाचे संचालन विलास केजरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अविनाश शेंडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अनुप ठवकर, गौरव आग्रे, धनंजय आग्रे, लोकेश ठवकर, सोनू मेश्राम, संकेत ढबाले, रोहन अास्वले, रुपेश ठवकर, विक्रम निंबार्ते, अविनाश शेंडे, सौरभ आग्रे, सागर शेंडे, वसंता टिचकुले, समीर मारवाडे व मराठे बॉईज ग्रुपच्या सदस्यांनी सहकार्य केले.