आमदार डॉ देवराव होळी
राजअनिल पोचमपल्लीवार
विदर्भ उपसंपादक गडचिरोली
चामोर्शी – दिनांक 23/2/2021 पंचायत समिती कार्यालय चामोर्शी येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 2019-20-21 वार्षिक विकास कामांचा आढावा व आमसभा आढावा बैठक गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी प्रामुख्याने संवर्ग विकास अधिकारी माने, उपसभापती वंदना गौरकार, नायब तहसीलदार दुधबले उपस्थित होते. उपस्थितांना गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी मार्गदर्शन केले व सांगितले तालुक्याचा विकास कामांना गती मिळाली पाहिजे व विकास कामात खंड पडू नये यासाठी सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांनी जातीने लक्ष द्यावे व प्रलंबित समस्त समस्या निकाली काढण्यात यावे. ज्या ठिकाणी निधीची कमतरता भासत आहे तेथील निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन आमदार डॉ देवराव होळी यांनी दिली. प्रलंबित विकास कामे निकाली काढण्याचे जाहीर आव्हान केले या बैठकीत तालुक्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठक यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे पेंदोर साहेब व कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.