आकाश शामकुरे
तालुका प्रतिनिधी, चिमूर
शंकरपूर (२३ फेब्रु.)- चिमूर तालुक्यातील शंकरपूर या गावातील श्री. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मॉडेल ग्रामसचिवालय शंकरपूर येथे आज थोर समाजसुधारक, राष्ट्र्संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज मॉडेल ग्राम सचिवालय शंकरपूर चे नवनिर्वाचित सरपंच श्री.साईश सतिश वारजूकर आणि ग्रा.पं. उपसरपंच अशोकजी ज्ञा. चौधरी यांनी दिप प्रज्वलित करून व माल्यार्पण करून अभिवादन केले, या प्रसंगी माजी उपसरपंच तथा सदस्य सौ.सविताताई चौधरी, ग्राम पंचायत सदस्य श्री.संजुभाऊ ननावरे , ग्राम पंचायत सदस्य नितीनभाऊ सावरकर, पंचायत सदस्य शंकर शेरकी, ग्राम पंचायत सदस्य निखिलभाऊ गायकवाड, ग्राम पंचायत सदस्य गिताताताई रानडे, ग्राम पंचायत सदस्य सपनाताई घडसे, ग्राम पंचायत सदस्य वंदनाताई सहारे, ग्राम पंचायत सदस्य बेबीबाई डाहारे,ग्राम पंचायत सदस्य ऐश्वकला ढोक ,ग्राम पंचायत सदस्य शारदा गायकवाड , ग्रामविकास अधिकारी श्री.किरणजी गायकवाड , वासुदेवजी मोहिणकर, व सर्व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.