विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि.२४ फेब्रुवारी :- महाराष्ट्र युवा परिषद या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दिनांक २३ फेब्रुवारीला निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र युवा परिषदेची सन २०२१-२२ या जिल्ह्याची कार्यकारणी नुकतीच गठित करण्यात आली आहे.
सदर बैठकीला युवा रुलर असोसिएशनच्या मृणाल मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य अभियान महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रत्यूष यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात अध्यक्षपदी आकाश रामटेके, उपाध्यक्ष कल्याणी डोंगरे(बागडे) सचिव अमिता राऊत, संवाद प्रमुख उमेश मोहतुरे, संगणक कौशल्य प्रगती सुखदेव, शासनाच्या विविध योजना सोनू शेंडे, संघटक प्रमुख ऋषी सुपारे, निमंत्रीत सदस्य प्रमोद येल्लजवार, सल्लागार म्हणुन सुषमा बन्सोड, प्राध्यापक नरेश आंबीलकर, विष्णुदास लोणारे, कार्तिकस्वामी मेश्राम तसेच प्रसिद्धीप्रमुख विलास केजरकर तर सदस्य म्हणून रोहित कावळे, छगन वैद्य, श्वेता ठवकर, शरद नानोटकर, मेघा भुरे, शितल वलथरे, पायल बिसने, दीक्षा चकोले, लक्ष्मी लोहारे इत्यादी कार्यकर्त्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यावेळी निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सदर कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांची उपस्थितांनी अभिनंदन केले.