आकाश शामकुरे
तालुका प्रतिनिधी, चिमूर
शंकरपूर (२३ फेब्रु):- कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे आपण सर्व हताश झालेले आहोत.
अशामध्येच शाषणाने अनेक महिन्याचा प्रतीक्षेनंतर कोरोना व्हायरस आजारापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीचे लसीकरण सुरू केलेले आहे , सशासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपण नियमांचे पालन करून कोविड निर्मूलनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायचा आहे.
समाजामध्ये अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या आहेत त्यांना घाबरून अनेक कोविड योध्ये लस घेण्यास घाबरत आहेत या अफवांना न घाबरता आपण सर्व कोविडयोध्ये मिळून एकमेकांच्या सहकार्याने ही कोरोना विरुद्धची लढाई लढताना, कोविड १९ प्रतिबंधक लस (कोविशील्ड) घेऊन शासनाला मदत करू या आणि स्वतःला ,कुटुंबाला व देशाला सुरक्षित ठेवूया
मी लस घेतली आहे तुम्ही पण लस नक्कीच घ्या आणि कोरोना लढ्याचा विरोधात शामिल व्हा असे आवाहन शंकरपूर येथील वंदनीय तुकडोजी महाराज मॉडेल ग्रामसचिवालय चे ग्रामविकास अधिकारी किरण गायकवाड यांनी केले आहे.