जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुरूड येथील बालभवन केंद्राचे उद्घाटन सोहळा संपन्न.
माया चांगदेव सोरते कार्यकारी संपादिका.
चामोर्शी:-दिनांक २४ फेब्रुवारी. चामोर्शी तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपाला आलेली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुरूड येथील “बालभवन” केंद्राचा आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
उद्घाटक गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के हे होते तर अध्यक्षस्थानी कुरूड गावच्या पोलिस पाटील यामिना भोयर ह्या होत्या.प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख हिम्मतराव आभारे सर,गट साधन केंद्राचे विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,शाळेचे मुख्याध्यापक बंडू शेडमाके,केंद्र शाळा चामोर्शीचे मुख्याध्यापक दुधबळे हे होते.
फुलोरा हा कार्यक्रम गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून जिल्हाभरात उपक्रम राबविल्या जात आहेत.त्याचप्रमाणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात लाभत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक जितेंद्र मुसद्दीवार यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम शाळेतील शिक्षक ईश्वर चौधरी,प्रभाकर उपरीकर,माधुरी कोत्तावार,मीना धाईत,वैशाली ईरावार यांनी घेतले.
प्रसंगी साधन व्यक्ती चांगदेव सोरते,केंद्र प्रमुख आभारे, पोलिस पाटील यामिना भोयर, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले.कुरुड येथील बालभवन केंद्र अतिशय नियोजनबद्ध आणि ज्ञउत्कृष्ट पद्धतीने केल्याने शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन केले जात आहे.