राहूल रामटेके
तालुका प्रतिनिधी, नागभिड
नागभिड(२७फेब्रु)चंद्रपूर जिल्हयातील दारूबंदी १ एप्रील २०१५ पासून अंमलात आली. ही दारुबंदी लागू करणेकरीता , अनेक मोर्चे निघाले, पायदळ लॉंगमार्च निघाले, अनेक महीलांनी एकत्र येत सामृहीक मुंडण आंदोलन केले. जिल्ह्यातील या व्यापक आंदोलनात्मक सुमारे ५८५ ग्रामपंचायती व जिल्हापरीषदेच्या अधीकृत प्रस्तावानंतरच दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र महाराष्ट्रात सत्तांतर होताच महाराष्ट्रातील व चंद्रपूर जिल्हयातील दारू व्यावसायिक संघटना व या दारू विक्रेत्यांसोबत आपले हितसंबंध जपणारे काही राजकीय मंडळी सक्रीय होवून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या हालचाली सुरु झाली. आणि च राजकीय दबाव वाढविण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी कायम ठेवावी की दारू पुन्हा सुरू करावी या संभ्रमातील पैलूंचा अभ्यास करण्याकरीता विचार-विमर्श करून निर्णय घेण्याच्या दृष्टींने मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी १२जानेवारी २०२१ रोजी शासन निर्णय एम.आय.एस./०८२०/प्र.क्र.१०२/राउशु-३या शासन निर्णयानुसार मा.रमाकांतजी झा. यांचे अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा सर्वकष विचार -विमर्श व अभ्यास करून शासनास शिफारस करणेकामी उच्चस्तरीय समीती स्थापण करण्यात आली.
चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी व दारूबंदी विषयक कायदे सक्तिचे व कड़क करून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीकरीता देवीदासजी जगनाडे सेवा निवृत प्राचार्य यांच्या नेतृत्वामध्ये ,सुबोध दादा गुरुदेव सेवा समिति अड्याळ टेकडी, हरीशचंद्र पाल स्व. रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था तळोधी बाळापूर, डॉ.सुर्यप्रकाश गभणे आरोग्य प्रबोधीनी वडसा, प्रा.नामदेवराव जेंगठे ओबीसी संघटना ब्रम्हपूरी, फाल्गुन राऊत मुरलीधर देवस्थान ब्रम्हपूरी, हरीशचंद्र चोबे समाजसेवा मंडळ ब्रम्हपूरी,, ऋषीजी राऊत अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपूरी, तुळशीराम सपाटे सत्य साईं सैवा समीती ब्रम्हपूरी, घनश्याम शेंडे परमात्मा एक सेवक ब्रम्हपूरी,
रेखाताई बुराडे श्री गुरूदेव महीला मंडळ अडयाळ टेकडी, सामाजिक कार्यकर्त्या आरती पुराम वडसा व कनिजा शेख ब्रम्हपूरी यांचे उपस्थितीत उपविभागीय अधिकारी ब्रम्हपूरी यांचे मार्फत ६१८९ सह्याचे निवेदन या मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई व रमानाथजी झा अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा दारूबंदी सर्वकष विचार विनीमय, उच्चस्तरीय समीती,तसेच विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर यांना सादर करण्यात आले. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी ब्रम्हपूरी यांच्या अनुपस्थितित मनोहर पवार, तहसिलदार ब्रम्हपूरी यांनी तर मा. विजय वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर यांचे अनुपस्थितित प्रभाकरराव शेलोकर अध्यक्ष तालूका कांग्रेस कमेटी ब्रम्हपूरी यांनी स्विकारले.