राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी, नागभिड
नागभिड( २८ फेब्रुं) तालुक्यातील सोनापूर(बुज.) येथे प्रथमच उमेद अभियानातून महिलाच्या पुढाकाराने आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामिन जिवन्नोती अभियान कक्ष नागभिड यांचे मार्गदर्शनात सुरू करण्यात आलेल्या या आठवडी बाजारात सेद्रिंय पध्दतीने उत्पादित केलेला भाजिपाला विक्री,मत्स्यविक्री, अभियानातील कृषीसखी यांनी तयार केलेले जैविक शेतीउपयोगी निमास्त्र, ब्रम्हास्त्र, आदी वस्तुचे विविध १६ स्टाँल या बाजारात लावण्यात आले होतो. तसेच गावातील इतरही लोकाचे स्टाँल लावून बाजार भरविण्यात आला. पहिल्यादांच शुक्रवारी भरविण्यात आलेल्या या बाजारात ३२ हजार रुपयाच्या मालाची विक्री ग्राहकाकडून करण्यात आली.धनलक्ष्मी महिला ग्रामसंघ व ग्रामपंचायच सोनापूर (बुज.)याच्यां या उत्कृष्ट उपक्रमाचे उद्घघाटन जिल्हा परिषद सदस्य श्री खोजराम मरस्कोल्हे यांचे हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसभापती रागीनी गुरपुडे ह्या होत्या.तर प्रमुख अतिथि म्हणून सवंर्ग विकास अधिकारी प्रणाली खोचरे, प.स.सदस्य पेंदाम, सरपंच शिला ठोबंरे, तालुका अभियान व्यवस्थापक मोहित नैताम, अमिर खान, तथा अभियानातील सर्व कर्मचारी,गावातील प्रतिष्टित नागरीक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसंघाचे सर्व महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या. या उपक्रमाचे सर्वत्र अभिनदंन करण्या येत आहे.