अनिल ठोकळ, विदर्भ संपादक
मेहकर : तालुक्यामधील हिवरा साबळे गट ग्रामपंचायतचे सरपंच प्रविण काठोळे यांच्या पुढारातुन, प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगांव यांच्या माध्यमातुन हिवरा साबळे जि.प.शाळेत कोरोना रॅपिड टेस्ट कॅप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गावाकऱ्यांनी स्वत:हुन कोरोना टेस्ट करण्यासाठी सहभाग नोंदवला होता. प्राथमिक आरोग्य विभागाने या कॅपद्वारे ४७ नागरिकांच्या तपासण्या केल्या असता ५ कोरोना संशयित असल्याचे आढळुन आले आहे.उर्वरीत नागरिकांच्या प्राथमिक आरोग्य विभाग डोणगांव मध्ये रॅपिड टेस्ट होणार आहेत.जिल्हामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी संचारबंदी लागु केली आहे.कोरोना चैन तोडण्यांसाठी निर्बध घातले आहेत.तरी सुध्दा काही नागरिकांच्या हारर्गर्जीपणामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याने हिवरा साबळे गट ग्रामपंचायतचे सरपंच प्रविण कोठाळे यांच्या पुढारातुन गावात कोरोना रॅपिड टेस्ट कॅप आयोजित करण्यात आला होता.यावेळी ग्रामविकास अधिकारी बि.ई.निकम, उपसरपंच गजानन ईरेगावकर,ग्रा.शिपाई रवि ढोरे, अनिल बुरुखंडे प्राथमिक आरोग्य विभागाचे सिएचओ डॉ.पाटील मॅडम, आरोग्य सेवक डॉ. शिवराम मिटकरी, आरोग्य सेविका बि.एच. केसकर,व अंगणवाडी सेविका,मदतनिस,आशा सेविका वंदना पवार आदि उपस्थित होते.