विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी परांडा
परंडा:-28फेब्रुवारी केस कर्तनाचे पैसे मागितल्याच्या वरून मातेफिरूंनी धूडगुस घालत एकावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील मुंळुब्रा येथे रमेश व नंदकुमार रमेश वाघमारे हे दोघे पिता-पुत्र शुक्रवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गावातील आपल्या केश कर्तनालय दुकानात होते यावेळी नमूद पिता-पुत्रांनी गावकरी शुभम दत्तात्रय वडणे यांना केश कर्तण्याचे पैसे मागितले असता शुभम यांनी चिडून जाऊन त्या दोघांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर शुभम चा मित्र सचिन शशिकांत कुटार यांन नंदकुमार यांच्या डोक्यात धारदार बताईने वार करून गंभीर जखमी केले तसेच केशकर्तन दुकानावर व दुकाना समोरील मोटरसायकलवर दगड मारून मोठे नुकसान केले अशा मजकुराच्या नंदकुमार वाघमारे यांनी 27 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेली लेखी निवेदन या नावावरून भा.दं.सं कलम-326,323,504 506,527,34 अंतर्गत तामलवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

