ताज्या घडामोडी

आत्महत्या प्रतिबंध दिवसा दिवशीच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सूर्यकांत वाघमारे
जिल्हा प्रतिनिधी
लातूर.

लातूर:मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला.सविस्तर माहिती अशी की, मराठा आरक्षण न्यायालयात न टिकल्याने त्या युवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नजीक उपस्थित व्यक्तीने त्याला तातडीने रुग्णालयात हलवले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आणण्यात आली आहे यामुळे मनावर नैराश्य येऊन युवकाने हे पाऊल उचलले आहे.जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त या युवकाने असे मोठे पाऊल उचलले आहे या एवढी दुर्देवी बाब कसलीच असू शकत नाही म्हणून याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर बसण्याचे संकेत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली जाणार आहे. मराठा आरक्षण न्यायालयात टिकू न शकल्याने तरुणावर ही वेळ आली आहे. हा एक उच्चशिक्षित असून या तरुणाने गुरुवारी साडेअकराच्या सुमारास हे जीवघेणे पाऊल उचलले आहे.
तो बोरगाव तालुका चाकुर येथील असून किशोर कदम वय 25 असे या तरुणाचे नाव आहे. तो सध्या स्पर्धापरीक्षेची तयारी करतो.मला तरुणाला एक सांगावेसे वाटते की खचला आहेस तरी राजा मरण स्वस्त करू नको, जगून दाखव हिमतीने आत्महत्येत मरू नको,ही सर्व घटना चाकुर तहसील कार्यालयासमोर घडली आहे तरी उद्धव ठाकरे सरकारने यावर पुनर्विचार करावा व मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावे अशी चर्चा, निवेदने महाराष्ट्रभर होत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close