सिंदपुरी कोवीड सेंटर येथे ऑक्सिजनची सोय करावी – भाजपा तालुका पवनीची मागणी
प्रदीप घाडगे/ मुख्य संपादक
सिंदपुरी कोवीड सेंटर येथे अनेक दिवसापासून कोवीड सेंटर सुरू आहे, मधल्या काळात पुराने सेंटरला वेडा घातल्यामुळे कोवीड सेंटर दुसरीकडे हलविण्यात आले होते, पण दिनांक 10/ 09 /2020 ला परत सिंदपूरी येथे कोवीड सेंटर सुरू करण्यात आले, हल्ली मोठ्या प्रमाणात कोरोना आढळून येत असल्यामुळे रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे, त्यात सेवेत असलेले कर्मचारी सुद्धा पाॅझेटिव झाले आहेत. ग्रामीण भागात चाचण्या करीत नाही कदाचित चाचण्या झाल्यावर मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येऊ शकतात, अशा परिस्थितीत सिंदपुरी कोवीड सेंटर ला ऑक्सिजनची व्यवस्था नाही त्यामुळे रुग्णांना भंडारा नागपूरला हलविले जाते अशात त्यांचे हाल होतात व केव्हा त्यांना आपला जीवही गमवावा लागतो.
करिता कोवीड सेंटर सिंदपूरी येथे तात्काळ ऑक्सिजनची ची व्यवस्था करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी पवनी तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आलेली आहे, यावेळी मोहन श्री सुरकर भाजपा तालुका अध्यक्ष पवनी अनिल मेंढे, किशोर पंचभाई, प्रकाश कुर्झेकर हिरालाल वैद्य, महामंत्री मच्छिंद्र हटवार तसेच सोनू भाजीपाले उपस्थित होते.