दिपाली मोकले / जिल्हा प्रतिनिधी
नांदेड—–जि .प .के .प्रा. शा. सुगाव ता.लोहा येथे शैक्षणिक वर्ष 2020- 21 चा नुकताच गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली आलेला शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला. यावेळी सरपंच दिलीप पाटील जाधव , केंद्रप्रमुख टि.पी. पाटील, केंद्रीय मुख्याध्यापक जी.एस. मंगनाळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश पाटील जाधव, उपाध्यक्ष रामदास पाटील जाधव, किरण राठोड, राजेंद्र तलवारे , हबीब शेख आदिंच्या प्रमुख उपस्थित इयत्ता पहिली ते सातवी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार तांदुळ,हरभरा व मुगदाळ शासनाने ठरवून दिलेल्या इ.1ते इ. 5 व इ.6ते इ.7 प्रमाणात देण्यात आले. covid-19 नियमाचे पालन करून मास्क चा वापर करून सामाजिक अंतर ठेवून शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला.