तुळजापूर दिनांक 18 प्रतिनिधी
शहरात संकल्प प्रतिष्ठान व धैर्यशील दरेकर मित्रपरिवार यांच्या वतीने “एक कुटुंब – एक वृक्ष” हा उपक्रम राबविल्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी लोकांमधून पाठबळ प्राप्त होत आहे. घर तेथे वृक्ष या संकल्पनेमुळे नागरिक थेट पर्यावरण रक्षणाच्या लढ्यात सहभागी होत आहेत.
एका छोट्या उपक्रमातून झालेली सुरुवात केली असून तुळजापूर शहरात १,००० पेक्षा अधिक वृक्षांचे वाटप करण्यात आले आहेत.
मकर संक्रांतीसारख्या पारंपरिक सणालाही पर्यावरण संदेश देत वृक्षमित्र सौ. संध्या धैर्यशील दरेकर यांनी हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांना फुले, फळांची रोपे व वृक्ष लागवडीसाठी कुंड्या भेट दिल्या.
शहरात वाढती काँक्रीटकरण, वृक्षतोड आणि प्रशासनाची ढिसाळ भूमिका यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना, हा उपक्रम सामाजिक संदेश देत आहे. संकल्प प्रतिष्ठान व दरेकर परिवार यांच्या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग वाढला आहे.
नगरसेविका सौ.श्वेता वैभव साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष अनिता सज्जनराव साळुंखे, निशा अवताडे प्रतीक्षा क्षीरसागर, नेहा क्षीरसागर, शितल चोपदार, शिवानी भालेकर, रश्मी भालेकर, सोनाली मुळे, पोर्णिमा कने, शिवकन्या हाजगुडे व इतर असंख्य महिलानी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.

| The response was: 550 5.1.1 The email account that you tried to reach does not exist. Please try double-checking the recipient’s email address for typos or unnecessary spaces. For more information, go to https://support.google.com/ |

5 thoughts on “संकल्प प्रतिष्ठान व दरेकर कुटुंबाचा “एक कुटुंब एक वृक्ष” संकल्पनेमुळे पर्यावरणाला पाठबळ ”