प्रा. रवींद्र आडेकर यांना संगणक शास्त्र विषयात पीएचडी प्रदान
तुळजापूर दि १७ प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. रवींद्र हरिश्चंद्र आडेकर यांना संगणक शास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.
तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभाग प्रमुख प्रा. रवींद्र आडेकर यांनी सादर केलेला विज्ञान व तंत्रज्ञान शाखा अंतर्गत “फ्रेमवर्क फॉर कोएक्झिस्टन्स ऑफ मल्टिपल डायव्हर्स वायरलेस टेक्नॉलॉजी” हा पीएचडी प्रबंध मार्गदर्शक डॉ. ए. के. कुरेशी, प्राचार्य, अंजुमन-आय-इस्लामचे एम. एच. साबू सिद्दीक पॉलिटेक्निक, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला.

सदरची पीएचडी पदवी प्राप्त करण्यासाठी प्रा .रवींद्र आडेकर यांनी ५ संशोधन पेपर ,५ स्टॅंडर्ड इंटरनॅशनल जनरल मध्ये प्रदर्शित केले. २ संशोधन पेपर इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये प्रदर्शित केले. औद्योगिक इंजिनिअरिंग क्षेत्रातील तीस वर्षाचा अनुभव असणारे प्रा. रवींद्र आडेकर तु.भ. अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील संगणक विभागासाठी विभाग प्रमुख म्हणून १३ वर्ष , ९ महिने प्रभारी प्राचार्य म्हणून काम केले. पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल ती.भ. मंदिर संस्थान अध्यक्ष कीर्ती किरण पुजार, आमदार राणाजगजीतसिंह पाटील व सर्व विश्वस्त, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश राजनकर, उप प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

| The response was: 550 5.1.1 The email account that you tried to reach does not exist. Please try double-checking the recipient’s email address for typos or unnecessary spaces. For more information, go to https://support.google.com/ |

https://shorturl.fm/X3L7K
https://shorturl.fm/FR4y1
https://shorturl.fm/w8dNO
https://shorturl.fm/UvwZY
https://shorturl.fm/cOdpz
https://shorturl.fm/NJuDR
https://shorturl.fm/Loh5q
https://shorturl.fm/9Uhwp
https://shorturl.fm/aMAmC
https://shorturl.fm/jESgX
https://shorturl.fm/pZlS6
https://shorturl.fm/2OM43