संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.31.संघटनांनी आपले सामाजिक दायित्व लक्षात घेऊन अशा प्रकारचे केलेले, सामाजिक उपक्रम केव्हाही समाजहिताचे असतात. तांत्रिक कामगार युनियनचे हे रक्तदान शिबिर प्रशंसनीय आहे. असे प्रतिपादन नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी केले आहे.
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन व महाराष्ट्र राज्य विद्युत क्षेत्र तांत्रिक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित भंडारा-गोंदिया यांच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालय नवेगावबांध येथे 28 ऑगस्ट रोज शुक्रवार ला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन अनिरुद्ध शहारे सरपंच नवेगाव बांध यांच्या हस्ते संपन्न झाले.त्यावेळी ते बोलत होते.
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन या संघटनेचा त्रेचाळीसावा वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहनिमित्त साकोली, भंडारा, गोंदिया येथे रक्तदान शिबिर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. covid-19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, संघटनेचा वर्धापन दिन 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या सप्ताहात साजरा करून, संघटनेचे सभासद एक रक्तदाता होऊन तसेच एक रक्तदाता देऊन समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. असे संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या रक्तदान शिबिरात 35 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्त होऊन रक्तदान केले विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन च्या या रक्तदान शिबिराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. देवरी विभागीय सचिव कुमेश योगराज पटले, अध्यक्ष आकाश वरखडे , व क्रिष्णा बडवाईक दशरथ पंचबुद्धे, सुनील बांते सुखदेव रहांगडाले, रवी फुलमाले, विलास सयाम, सागर ठवकर, ठाकूर, शेंडे,दिलीप टेटे,निशांत शहारे, भूषण टेम्भूर्णे, लोकेश जिवतोडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व समस्त मित्र परि वार यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.