धाराशिव जिल्ह्यात आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रबळ पार्टी, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठे प्रवेश होणार ?

धाराशिव दिनांक १९ डॉ सतीश महामुनी

नगरपालिका निवडणुकीच्याच्या पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये विशेषता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची खूप मोठी गर्दी निर्माण झाली आहे . यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पार्टी मधून बाहेर पडण्याचे प्रमाण अद्याप सुरूच आहे.

शिवसेना (उबाठा) गटातील पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच चिलवडीचे माजी सरपंच श्री. शामभैय्या जाधव यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री. सुरेशभाऊ देशमुख, श्री. नितीन काळे, श्री.नेताजी पाटील, श्री.नितीन भोसले, श्री.दत्ता देवळकर, श्री.राजाभाऊ पाटील, श्री. बालाजी गावडे यांच्यासह चिलवडी व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य पातळीवर भारतीय जनता पार्टी पक्षाला खूप चांगले यश मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे पार्टीमध्ये प्रवेश करण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यात आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखावर विश्वास ठेवून खूप मोठ्या संख्येने शिवसेना आणि इतर पक्षामधून पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे सत्र सुरूच आहे.

आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागामधील इतर पक्षातील मंडळी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत तुळजापूर तालुक्यात खूप मोठा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कामकाजाचा अनुभव असणारे लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीत विशेषता आमदारांना जगजीत सिंह पाटील आणि भाजपने येथे सुनील मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करीत असल्याचे वृत्त आहे.

4 thoughts on “धाराशिव जिल्ह्यात आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रबळ पार्टी, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठे प्रवेश होणार ?

  1. Pingback: vibramycin for uti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *