लोकसहभागातून भव्य स्मारक : आमदार राणाजगजितसिंह पाटील 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी व्यापक कृती समिती

धाराशिव दिनांक १७ डॉ. सतीश महामुनी

धाराशिव जिल्हा स्थान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी मोक्याच्या शासकीय दूध संघाच्या जागेची निवड करण्यात आल्यानंतर सदर महागडी जागा शासनाच्या निर्देशानुसार उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य शासनाचे आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाने हा सकारात्मक निर्णय केला आहे. धाराशिव जिल्हावासियांनी याचे जोरदार स्वागत केले आहे.

धाराशिव शहरात साकारण्यात येणाऱ्या अण्णाभाऊंच्या भव्य स्मारकासाठी व्यापक कृती समिती गठित करण्यात येणार आहे. त्याची नोंदणी करून बँकेत खाते उघडले जाईल. पारदर्शकता रहावी यासाठी केवळ धनादेशाद्वारे थेट बँक खात्यात लोकसहभाग स्वीकारण्यात येईल. समाजबांधवांसह विविध समाज घटकातील नागरिकांच्या सहभागाने जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक स्मारक उभारण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्वप्रथम स्वतःचा एक लाख रुपयांचा सहभाग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी दिला आहे.

धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारण्यासाठी शासकीय दूध संघाची जागा विनामूल्य देण्याच्या शासन आदेश शुक्रवारी निर्गमित करण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर पूर्वीच शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या आदेशामुळे नगरपालिकेचे ₹ २ कोटी वाचणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या भव्य आणि ऐतिहासिक स्मारक उभारणीच्या अनुषंगाने सोमवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत स्मारक उभारणीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वानुमते स्मारकासाठी व्यापक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीची अधिकृत नोंदणी करून बँक खाते काढण्याचेही बैठकीत ठरले. सर्व आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता रहावी यासाठी लोकसहभागाची रक्कम केवळ धनादेशाच्या माध्यमातूनच स्वीकारण्याची सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केली. त्याला बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वांनीच उत्स्फूर्तपणे सहमती दर्शवली. स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून यापूर्वीच आपण ₹ १.५० कोटी निधी मंजूर करवून घेतला आहे. अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे अभिवचनही आपण पालिका निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वचननाम्यात दिले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले. तत्कालीन महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यासाठी नगरपालिकेला शासनाकडे जागेच्या मोबदल्यात बाजारभावाप्रमाणे ₹ २ कोटी ८ लाख भरणे आवश्यक होते. पालिकेकडे निधी नसल्याने हा विषय प्रलंबित होता. मात्र शासनाने विशेष बाब म्हणून सदर रक्कम माफ करावी यासाठी आपण सतत पाठपुरावा केला. त्यानंतर आपल्या महायुती सरकारने मागील पंधरवड्याखाली जागा निःशुल्क उपल्ब्ध करून देण्याच्या आपल्या मागणीवर शिक्कामोर्तब केले. आता हे स्मारक भव्य, दर्जेदार व प्रेरणादायी स्वरूपात साकारण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी समाजातील सर्व स्तरातील विविध घटकांच्या सहकार्याने आणि योगदानातून राज्यभरात लौकिकास पात्र ठरेल असे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्पही या बैठकीत करण्यात आला. यावेळी दत्ता पेठे ,नगरसेवक विलास लोंढे, बापु पवार ,कानिफनाथ देवकुळे ,शिवाजी गायकवाड नळदुर्ग ,युवराज शिंदे,सचिन लोंढे,दयानंद शिंदे ,विजय क्षिरसागर तुळजापुर ,विलास रसाळ तेर ,विलास रसाळ ढोकीकर ,अभिमान पेठे ,यशवंत पेठे रोहिदास झोबाडे ,राजु रसाळ, सुमेध क्षिरसागर, किसन पेठे ,काकासाहेब पेठे, सतोष पेठे, सतोष मोरे, शंकर मोरे ,अंकुश पेठे ,शिवाजी क्षिरसागर दादा पेठे ,खंडू चांदणे उपस्थित होते.

या प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्य :

सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका आणि उद्यानही

या स्मारकाच्या ठिकाणी सुसज्ज असे ग्रंथालयही उभारण्यात येणार आहे. ज्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र ग्रंथसंपदेसह इतरही मौलिक ग्रंथांचा समावेश असणार आहे. त्याबरोबरच एक अद्यावत अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रही याठिकाणी साकारले जाणार आहे. एमपीएससी आणि युपीएससी परीक्षेचे पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.यात कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र देखील असणार आहे.तसेच विविध प्रकारच्या कार्यक्रमासाठी एक सांस्कृतिक सभागृह देखील याठिकाणी प्रस्तावित आहे. त्याचबरोबर आकर्षक असे भव्य उद्यान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जिल्ह्यातील पहिला पूर्णाकृती पुतळा याठिकाणी साकारण्यात येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.

4 thoughts on “लोकसहभागातून भव्य स्मारक : आमदार राणाजगजितसिंह पाटील 

Leave a Reply to Cameron128 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *