Uncategorized
काँग्रेस नेते अभिषेक कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे चादर वाटप
पंढरपूर विशेष प्रतिनिधी
पंढरपूर ता-पंढरपूर येथे काँग्रेसचे सांगोला तालुकाध्य काँग्रेस नेते अभिषेक भैय्या कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर दत्त घाट, बस स्टॉप,वाळवंट,व पांडुरंग मंदिर येथे बेघर गरीब गरजू लोकांना ब्लॅन्केट वाटप करून. आगळा वेगळा उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भा.मा.युवक संघटना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख केतन यादव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवित आला यावेळी केतन यादव म्हणाले की अभिषेक भैय्या कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त हार बुके फेट्याला खर्च न करता. त्या पैशातून आम्ही गरीब गरजू बेघर लोकांसाठी ब्लॅन्केट वाटप करून हा वाढदिवस साजरा करत आहोत असे म्हणाले. या वेळी पंढरपूर येथील तुषार धायगुडे, शनि पाटोळे,वैभव कुंभार आदि उपस्थित होते.
