मातंग समाजाचे प्रांत कार्यालय समोर आमरण उपोषण

वेळापूर ता ( माळशिरस ) येथील माजी सैनिक निशिकांत शिंदे यांना राज्य सरकारकडून भाल करण्यात आलेली सिलिंग ॲक्ट जमिन गट नं १७८८ या गटाचे शर्तभंग झालेलं असुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन ती जमिन सरकार जमा करण्यात यावी या मागणीसाठी सकल मातंग समाज वेळापूर शहराच्या वतीने प्रांत अधिकारी कार्यालय अकलूज या ठिकाणी अजितदादा साठे,सुनील साठे,बजरंग कांनगे,अतुल साठे,हे सदर आमरण उपोषणाला बसले आहेत,यावेळी दादासाहेब लोखंडे,दिंगबर साठे,नवनाथ साठे,रघुनाथ साठे,नंदकुमार लांडगे,कैलास वामन,आकाश लोखंडे,अनिल साठे, बापूसाहेब वाघमारे,रुक्मिणी रणदिवे,पप्पू मिसाळ,अवदुत कांबळे,अरुण खंडागळे,गणेश खंडागळे,महादेव नाईकनवरे,राहुल साठे,महेंद्र साठे,समिल साठे,अभिजित साठे,हनुमंत साठे,महेश साठे आदी समाज बांधव सह महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला,यावेळी जनसेवा संघटना मागासवर्गीय आघाडीचे तालुकाध्यक्ष रघुनाथ साठे,नवनाथ साठे,विशाल साठे, युवराज साठे,विशाल अडसूळ, सौरभ भालके,विकी शिंदे,जनाभाऊ लोखंडे,शुभम सपताळे,यश लोंढे,ऋषी खंडागळे,राहुल खुडे,आदी मान्यवर उपस्थित होते…!
यावेळी अजित साठे म्हणाले की , गेली अनेक वर्षे झाली वेळापूर येथील आण्णा भाऊ साठे स्मारकाचा प्रश्न निर्माण झाला आहे,अनेकवेळा आमदारांकडे समाज बांधव जायचे आणि आमदारांनी आठ दिवसांत स्मारक बांधायला चालू करु म्हणून समाजाला झुलवत ठेवलं ज्या मातंग समाजाने विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांना सरपंच पदापासून ते आमदारपदा पर्यंत मदत केली त्याच मातंग समाजाचा विद्यमान आमदारांनी विश्वास घात केला ही त्यांची नामुष्की तर आहेच,पण विद्यमान आमदार हे S C जागेवर निवडुन आले आणि त्यांचाच गावात आण्णा भाऊ साठे पुतळ्याची ही अवस्था आहे