Uncategorized

माळशिरस येथील 125 जयंती मागासर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

माळशिरस प्रतिनिधी- निर्मला मदणे

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग अंतर्गत 125 जयंती मागासर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह माळशिरस जि. सोलापूर या शासकीय वसतिगृहात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरीता इयता 8 वी व पुढील सर्व शैक्षणिक अभ्यास क्रमाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी अनु.जाती/अनु.जमाती/इतर मागासवर्गीय/विशेष मागासवर्गीय/विजाभज/अपंग/अनाथ तसेच गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाचे अधिक्षक श्री.थोरात सर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.इच्छुक विदयार्थ्यांनी https://hmas.mahait.org/ या पोर्टलव्दारे प्रवेश अर्ज ऑनलाईन भरून ऑनलाईन अर्जाची प्रिंट व त्यासोबतची लागणारी स्वसांक्षांकित केलेली कागदपत्रे 125 जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, माळशिरस, जि.सोलापूर येथे जमा करावयाचे आहेत.सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षामध्ये वसतिगृह प्रवेशासाठी ज्या विदयार्थ्यांनी यापुर्वी वसतिगृहामध्ये ऑफलाईन अर्ज सादर केलेले आहेत. त्यांनीसुध्दा https://hmas.mahait.org/ या पोर्टलव्दारे प्रवेश अर्ज ऑनलाईन भरणे बंधनकारक आहे. वसतिगृह प्रवेशासाठी अर्जासोबत गुणपत्रिका, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड प्रत, रहिवासी दाखला, बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड / शैक्षणिक शुल्क भरणा पावती, गॅप सर्टिफिकेट (गॅप असल्यास) व रेशन कार्ड प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. वसतिगृह पात्र विदयार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा, निवास, नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण हे विनामुल्य आहे. याव्यतिरीक्त निर्वाह भत्ता प्रतिमाह रूपये 600 हा विदयार्थ्यांना दिला जातो, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button