Uncategorized

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त लोकहितवादी सेवा संघाच्यावतीने पुष्पहार अर्पण

चिंचवड (प्रतिनिधी) – छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती लोकहितवादी सेवा संघ (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने चिंचवड येथील केएसबी चौकातील शाहू महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.या प्रसंगी संघाचे संस्थापक अध्यक्ष धर्मराज बनसोडे यांनी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायासाठीचे योगदान, विशेषतः आरक्षण व्यवस्था आणि बहुजनांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्यावर मार्मिक भाषण केले.तसेच संस्थेचे समन्वयक विकास वाघमारे यांनीही आपल्या भाषणातून शाहू महाराजांच्या विचारांचा आजच्या समाजात कसा प्रभाव आहे, यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाला संघाचे अनेक सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये प्रमुख उपस्थित सदस्य म्हणजे –धर्मराज बनसोडे, विशाल वाघमारे, विकास वाघमारे, कमल म्हसके ताई, समद शेख, बेबिना बेहेरा, ब्युटी सिंग, निगम राय, पुष्पा सिंग, रोहित चंदणे, पूजा गायकवाड, अतिश दुधावडे, भीमराव वाघमारे, अनिता कुशवा, राणी राणा, आशा वायदंडे, संघर्ष म्हसके, उमेश खेडकर, दुर्योधन बेहेरा, दत्तात्रय व्हनकडे, सरस्वती अकलूजकर, जयश्री वडले इत्यादींसह अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साही वातावरणात पार पडले. उपस्थितांनी शाहू महाराजांच्या विचारांना अंगीकारून समाजसेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button