वारकरी संप्रदायासाठी लोकहितवादी सेवा संघातर्फे अन्नवाटप व साड्यांचे वितरण

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
लोकहितवादी सेवा संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने आज दिनांक 19 जून 2025 रोजी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात आयोजित कार्यक्रमात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी संप्रदायासाठी अन्नवाटप सेवा व साड्यांचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमात निगडी येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी आकुर्डी येथे येत असताना, त्या मार्गावरील वारकऱ्यांना 2025 साड्यांचे तसेच उपवासासाठी योग्य अशा अन्नपदार्थांचे वाटप करण्यात आले. या पुण्यसंकल्पाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचे भाग्य लाभल्याचे समाधान लोकहितवादी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. धर्मराज बनसोडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमावेळी संघाचे सचिव श्री. विशाल वाघमारे, समन्वयक विकास वाघमारे, मुख्य संघटक समद शेख, संपर्क प्रमुख अतिश दुधावडे, दत्तात्रय व्हनकडे, कार्यकारिणी सदस्य भीमराव वाघमारे, काळेवाडी प्रभाग महिला अध्यक्ष बेबीना बेहरा, तसेच ब्युटी सिंग, निगम राय, उमेश खेडकर, संघर्ष म्हस्के, कुणाल कांबळे, दुर्योधन बेहरा, राम कापरे आणि इतर अनेक सदस्य उपस्थित होते.