मोही येथे पैलवान किरण भगत स्पोर्टस फाउंडेशनच्य वतीने योग साधना शिबीर संपन्न.

माण तालुका प्रतिनिधी.
मोही ता-माण जिल्हा-सातारा येथे पै.किरण भगत सपोर्ट फाऊंडेशन यांच्या वतीने योगा दिनाच्या निमित्ताने योगा साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे हे दुसरे वर्ष असून यावेळेस मोही गावातील कन्या विद्यालय, श्री महालक्ष्मी विद्यालय व जुनिअर कॉलेज व जिल्हा परिषद शाळा व प्राध्यापक व शिक्षक वर्ग सर्व कर्मचारी त्याचबरोबर ग्रामस्थ मोही तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत व महिला वर्ग फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळेस शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना योगा दिवसानिमित्त टी-शर्ट वाटप करण्यात आले. उपस्थित प्रमुख पाहुणे व विद्यार्थ्यांस फाउंडेशन मार्फत खाऊ वाटप करण्यात आला.तसेच प्रमुख उपस्थिती पाहुणे व योग गुरु, शाळेचे प्राचार्य यांना शाल श्रीफळ वा फाउंडेशन मार्फत सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. व्यायामाचे व योगासनाचे आवड निर्माण व्हावी याही तुम्ही जागतिक योगा दिवस यानिमित्त हा फाउंडेशन मार्फत छोटासा प्रयत्न आज करण्यात आला होता. सरासरी मोही गावातील४०० ४५० विद्यार्थी ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले.त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.याही पुढे खूप चांगले उपक्रम पैलवान किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) सार्वजनिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यक्रम यांच्यामार्फत घेण्यात येते.
🔴आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा
News24मराठी https://youtube.com/channel/UCFzlxq9Y06BgZy1tt42–pQ?si=rOCMyt77mdZhxg6h
जाहीराती व बातम्यासाठी
संपर्क संपादक -केतन यादव
7709023563





