माळशिरस तालुक्यातील बोगस घरकुलांची चौकशी करून. ग्रामसेवक सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा-केतन यादव

माळशिरस प्रतिनिधी
माळशिरस ता- माळशिरस जिल्हा-सोलापूर ह्या तालुक्यात ज्यांना घरकुल मंजुर झाले आहेत. त्यांनी घरकुल न बांधता ग्रामसेवक सरपंच व इ संबंधित अधिकाऱ्यांनी मिळून घरकुल न बांधता घरकुलांची चे बिले दिली जात आहेत.तरी अशा माळशिरस तालुक्यातील बोगस घरकुलांची चौकशी करून.ग्रामसेवक सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी काल केतन यादव यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस व जिल्हा परिषद बांधकाम उप-विभागीय कार्यालय माळशिरस यांच्या कडे चौकशी करून कारवाई करावी. असे पत्र देण्यात आले आहे. या वेळी केतन यादव म्हणाले.माळशिरस तालुक्यात ज्यांना खरोखरच घरकुलाची गरज आहे. त्यांना घरकुलाचा लाभ आत्ता पर्यंत मिळाला नाही.व ज्यांना मिळाली आहे. त्यांना घरकुल न बांधता घरकुलांची बिल दिली जात आहेत. अशा बोगस घरकुलांची 5 दिवसाच्या आत चौकशी करून या मध्ये ग्रामसेवक सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही.तर पंचायत समिती माळशिरस येथे तीव्र स्वरूपाच आंदोलन करण्यात येईल. यावेळेस माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.