Uncategorized

स्वामी विवेकानंद विद्यालयात विद्यार्थ्यांचा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख

निंबोडी स्वामी विवेकानंद विद्यालय येथे गोकुळाष्टमीचे निमित्त साधून विद्यालयात दहीहंडीचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात दहीहंडी फोडली. शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान देवराई संचलित स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या ठिकाणी संस्थाचालक संस्थेच्या सचिव माननीय श्रीमती बडे मनीषा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या सचिव मनीषा बडे/ पालवे मॅडम ने विद्यार्थ्यांनी जीवन जगत असताना भगवान श्रीकृष्ण सारखे जगावे. अशा पद्धतीने मार्गदर्शन केले .तसेच भगवान श्रीकृष्णाचे चरित्र समोर ठेवून त्यांच्या जीवनातील विविध दाखले देऊन विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे दिले. प्राथमिकचे मुख्याध्यापिका सुवर्ण बारावेकर मॅडम व पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका छाया सरोदे मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम यांच्या नियोजनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला सातवी ,आठवी, नववी ,दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी दोन थराचा मनोरा तयार केला होता .तसेच दहीहंडी फोडण्यासाठी श्रीकृष्ण ची वेशभूषा इयत्ता चौथी मधील हर्ष महाडिक या विद्यार्थ्याने केली होती .श्रीकृष्ण बनून हर्षने दहीहंडी फोडली .तर राधेची वेशभूषा इयत्ता तिसरी मधील दिव्या बोरुडे या विद्यार्थिनीने केली होती .सोबतच विद्यालयातील सर्वच मुली वेशभूषा करून आल्या होत्या .तसेच मुलांनीही पारंपारिक वेशभूषा केली होती. विद्यालयातील पूर्व प्राथमिकचे चिमुकले बालगोपाल राधाकृष्ण बनले होते. कार्यक्रमाच्या दरम्यान दहीहंडीचे वेगवेगळे गाणे वाजवण्यात आले यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी गाण्यांचा आनंद लुटला . सर्व विद्यार्थ्यांना दहीहंडीतील काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. काल्याच्या प्रसादामध्ये जसे वेगवेगळे पदार्थ एकत्र करून त्या प्रसादाची चव वाढवतात. त्याचप्रमाणे विद्यालयात देखील वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी येतात व विद्यालयात आल्यानंतर सगळे एकमेकांमध्ये मिसळून जातात. या मुलांमध्ये भेदभाव राहत नाही . या अशा कार्यक्रमांमधूनच विद्यार्थ्यांवरती संस्कार केले जातात .विद्यालयामध्ये वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात .त्यामधून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी करत असतात .सर्वांच्या सहयोगाने कार्यक्रम अतिशय सुंदर रित्या पार पाडले जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button