कोल्हापूर परीक्षेत्र पोलीस महानिरीक्ष (IG) मा .सुनील फुलारी यांची तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी घेतली भेट.
महूद बु.ता – सांगोला येथील दलित तरुण स्व.सुनील कांबळे हत्ये प्रकरणी तपास योग्य पद्धतीने व्हावा यासाठी सांगोला तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी कोल्हापूर परीक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक (IG) मा. सुनिलजी फुलारी साहेब यांना तपास योग्य पद्धतीने होत नसले बाबत तक्रार केली होती. तक्रारीची तात्काळ दाखल घेऊन IG साहेबांनी त्वरित मा.पोलीस अधीक्षक, तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक श्री.गायकवाड यांना तसे आदेश केले . सदर प्रकरनामध्ये आरोपीना तात्काळ अटक करण्यात आली तपास योग्य पद्धतीने करून स्व.सुनील कांबळे यांच्या कुटुंबियांच्या शंकाचे निरसन करून कुटुंबियांना अभय दिले. तपास योग्य रीतीने सुरु असल्या बद्दल व तपासात स्वतः IG मा.फुलारी साहेब यांनी लक्ष दिल्या बद्दल पोलीस महानिरीक्षक मा.फुलारी साहेबांचे सांगोला काँग्रेस तालुकाध्य अभिषेक कांबळे, नगरसेवक कृष्णा वाघमारे व मयत सुनील यांचे बंधू अविनाश कांबळे, गणेश लोखंडे यांनी भेट घेऊन आभार मानले. यावेळी IG मा.फुलारी साहेब म्हणाले की याचे पूर्ण श्रेय हे तपास अधिकारी DySP मा. विक्रांतजी गायकवाड यांचे आहे . “ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनाता पोलिसांन बद्दल तक्रार करते तश्याच पद्धतीने चांगले काम केल्यास आपले कौतुकही करते” अश्या पद्धतीचे गौरोदगार यावेळी पोलीस महानिरीक्षक मा. फुलारी साहेब यांनी काढले व पुढील काळात अश्या घटना घडू नये यासाठी कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना नूतन मा. पोलीस अधीक्षक व उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक मा.अतुलजी कुलकर्णी,पोलीस सह.अधीक्षक मा. प्रितमजी यावलकर,होम DySP मा.कुरी मॅडम, मंगळवेढा DySP मा.विक्रांतजी गायकवाड,अकलूज DySP मा.नारायणजी शिरगांवकर,पंढरपूर DySP मा.अर्जुनजी भोसले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.या वेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांना मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल IG मा. सुनिलजी फुलारी साहेब व त्यांचा स्टाफ व DySp मा. गायकवाड साहेब यांचे आभार मानले.