विशेष
नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय महारुद्र परजणे व पोलीस कर्मचारी यांना उत्कृष्ट गुन्हे सिद्धी पुरस्कार
नातेपुते प्रतिनिधी- चंदु खिलारे.
नातेपुते ता-माळशिरस येथील नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे तसेच पोलीस स्टेशन मधील काही पृष्ठ काम करणारे पोलीस कर्मचारी यांनापोलीस अधीक्षक यांच्या हस्ते उत्कृष्ट गुन्हे सिद्ध पुरस्कार देण्यात आला.सोलापूर ग्रामीण तर्फे शिंगणापूर घाटातील हार्वेस्टिंग व मोटारसायकल अपघात झाला होता त्यावेळी घटनास्थली लवकर जाऊन मदत केल्याबद्दल मा पोलीस अधीक्षक सो अतुल कुळकर्णी सर,अप्पर अधीक्षक प्रीतम यावलकर यांचे हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने पोकॉ अमोल देशमुख HC/211 राहुल रणनवरे, पोना 559 अमोल वाघमोडे पोना 562 राकेश लोहार यांना उत्कृष्ट गुन्हे सिद्धी पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच पुरस्कारार्थी यांचे सोशल इंडियाच्या माध्यमातून कौतुक होत आहे.