विशेष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभाग जिल्हा सरचिटणीस पदी श्री सुरज सदाशिव अवघडे यांची निवड

सोलापूर प्रतिनिधी / चंदु खिलारे

आज महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह (मोठे दादा )मोहिते पाटील साहेब माळशिरस तालुक्याचे जानते राजे व किंग मेकर आदरणीय जयसिंह उर्फ बाळ दादा मोहिते पाटील साहेब माढा लोकसभेचे विद्यमान खासदार आदरणीय श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब जिल्हा परिषद सोलापूरचे माजी अध्यक्ष आदरणीय फत्तेसिंह दादा माने पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय उत्तमराव जानकर साहेब व माळशिरस तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्थान युवा नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व सातारा जिल्ह्यातील प्रभारी आमचे नेते चिरंजीव संकल्प भैया हनुमंतराव डोळस साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक धनंजय साठे सर व माढा विधानसभेचे भावी आमदार आदरणीय शिवतेसिंह (शिवबाबा )मोहिते पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज वेळापूर गरुड बंगला येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लोकनेते मा श्री उत्तमरावजी जानकर साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद चंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय माननीय श्री धनंजय साठे सर यांच्या हस्ते आज सामाजिक न्याय विभागाच्या खालील पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या. माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी सुरज अवघडे याची नियुक्ती करण्यात आली व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आल्या नागनाथ खंदारे – जिल्हा कार्यकारिणी सदस्य, अब्बासभाई शेख- माळशिरस तालुका उपाध्यक्ष, गुलाबभाई तांबोळी – तालुका सरचिटणीस, सिद्धार्थ गायकवाड -अकलूज शहराध्यक्ष, गोरख मोहिते – तालुका सचिव व अनिल पवार यांची तालुका कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली.यावेळी लोकनेते उत्तमराव जानकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे पुरोगामी विचार व ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.या कार्यक्रमासाठी युवा नेते जीवनभैय्या जानकर, सामाजिक न्याय विभागाचे राज्य संघटक सचिव तुकाराम साळुंखे पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष सज्जनभाऊ लोखंडे, सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ तोरणे, सामाजिक न्याय विभाग माळशिरस तालुकाध्यक्ष तथा वेळापूरचे विद्यमान सरपंच रजनीश बनसोडे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button