Uncategorizedसामाजिक

टेंभुर्णी येथील शासकीय विश्रामगृह चालू करण्यात यावे – केतन यादव

टेंभुर्णी ता- माढा येथील शासकीय विश्रामगृह काही दिवसांन पासून बंद अवस्थेत आहे तरी हे शासकीय विश्रामगृह लवकरात लवकर दुरूस्ती करून चालू करण्यात यावे.असे निवेदन भारतीय मातंग युवक संघटनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख केतन यादव यांनी सार्वजनिक बांधकाम उप-विभागीय कार्यालय कुर्डूवाडी यांना देण्यात आले आहे.या वेळी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेस केतन यादव म्हणाले की हे टेंभुर्णी येथील शासकीय विश्रामगृह ची इमारत ही प्रशस्त असुन खुप दिवसांपासुन बंद अवस्थेत आहे.या मुळे ह्या भागात शासकीय कामकाजा साठी आलेल्या अधिकारी व इ अधिकाऱ्यांना ह्या भागात रहाण्याच्या खुप अडचणी होत आहेत.व इमारत ही प्रशस्त असुन हे शासकीय विश्रामगृह लवकरात लवकर सुरू केले नाही तर भारतीय मातंग युवक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उप-विभागीय कार्यालय कुर्डूवाडी येथील कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल. या बाबत संबंधित अधिकाऱ्यानी टेंभुर्णी ता-माढा येथील शासकीय विश्रामगृह लवकरात लवकर दुरूस्ती करून हे विश्रामगृह चालू करण्यात यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button