मोटेवाडी येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती साजरी.
मोटेवाडी ता- माळशिरस जिल्हा-सोलापूर येथे साहित्यरत्न साहित्यसम्राट लोकशाहीर डाॅ. आण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती पहिल्यांदाच साजरी करण्यात आली.सर्व प्रथम मोटेवाडी गावचे प्रथम नागरीक सरपंच श्री. सतिश मोटे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.व गावातून लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळेस विशाल (माऊली)वायदंडे,सागर वायदंडे,लक्ष्मण वायदंडे, समाधान वायदंडे,विठ्ठल वायदंडे ,राजू वायदंडे,रमेश नामदास, हनुमंत नमदास ,चैतन्य वायदंडे,वैभव वायदंडे,जयदेव अवघडे,विशाल वायदंडे,सूरज वायदंडे,गणेश वायदंडे ,आप्पा वायदंडे सायबा वायदंडे,अविनाश वायदंडे यांनी जयंती यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यावेळेस युवकांनी मोटेवाडी येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती समिती स्थापन करून. समजाच्या हितासाठी व एकजुटी करण्याची गरज आहे. अशी भावना तयार करून एक चांगला आदर्श निर्माण केला. व जयंती शांतपणे पार पडली. यावेळेस मोटेवाडी गावातील सर्व समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.