महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या आंदोलनाला मिळाले यश
प्रतिनिधी : : महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून गेली एक वर्षे झाली दहिगाव गावातील विविध प्रकारच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे काम दहिगाव शहराचे अध्यक्ष सचिन खिलारे यांनी केले आहे.त्यांनी जानेवारी महिन्यात पाहिले आंदोलन केले होते,त्यावेळी त्यांना १५ दिवसात कामे पूर्ण केली जातील असे लेखी आश्वासन दिले होते.मात्र दहिगाव ग्रामपंचायतीने लेखी दिलेली कामे आठ महिने उटलून गेले तरी पूर्ण न केल्याने सचिन खिलारे यांनी १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या समोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.यावेळी दहिगाव शहराध्यक्ष सचिन खिलारे, विभाग प्रमुख तात्या खिलारे,नाना पवार,किसन खिलारे,विजय सरवदे ,राहुल पाटील ,सचिन किर्दक ,आबा अवघडे ,सुनील ,जगताप,धिरज साळवे इत्यादी उपस्थित होते.उपोषणाच्या इशाऱ्यानंतर दहिगाव ग्रामपंचायत जलजीवन मिशन योजनेचे काम पावसामुळे बंद होते ते सुरू करण्यात आले आहे, आण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार ठराव मंजूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंजुरी मिळालेनंतर काम सुरू करण्यात येईल,स्मशानभूमीलगत असलेली गटार मंजूर असून १५ दिवसात पूर्ण होईल,वालचंद नगर रोड ते मधुकर खिलारे गटारीचे व रस्त्याचे काम झाले चालू केले आहे असे लेखी पत्र दिले व कामाला सुरुवात केल्याने उपोषणाला स्थगिती देण्यात आली,महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. सचिन खिलारे यांनी दहिगाव गावातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याने पक्षप्रमुख किरण साठे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.