खंडकरी शेतकऱ्यांचे नेते श्री.बी.डी.पाटील यांचे निधन.
दहिगाव प्रतिनिधी.
खंडकरी शेतकऱ्यांनसाठी चाळीस वर्षे अविरतपणे लढा देणारे महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भिकाजी दशरथ पाटील (बी.डी.पाटील) यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.बी.डी.पाटील यांनी माजी खासदार माधवराव गायकवाड व माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या सोबत खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.सुरुवातीच्या काळात शिक्षकी पेशा असणाऱ्या व काँग्रेसची विचारधारा जोपासणाऱ्या बी.डी.पाटील यांनी सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम केले असून त्यांनी एस. टी. महामंडळ व कॉटन फेडरेशन तसेच बोर्डिंग हाऊसचे संचालक म्हणून त्यांनी काम केले होते.त्यांच्यामागे पत्नी, भाऊ, बहिणी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून कृषी अधिकारी धैर्यशील पाटील व इंदापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष आणि वालचंदनगर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सत्यशील पाटील हे त्यांचे पुत्र होत.