दहिगावमध्ये विराट जाहीर निषेध मोर्चा-देशात मागासवर्गीयांवर अन्याय वाढलेत, आम्ही रस्त्यावर उतरलो तर राज्य सरकार व केंद्र सरकार यांना पळता भुई थोडी होईल-लखन सोरटे
दहिगाव प्रतिनिधी.
दहिगाव ता-माळशिरस जिल्हा-सोलापूर येथे परभणी येथे संविधान शिल्पाची विटंबना केल्याबद्दल तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेबद्दल 22-12-2024 रोजी जनता आर्मी चे संस्थापक लखन सोरटे यांच्या नेतृत्वात दहिगाव याठिकाणी आज जाहिर निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारापासून हा मोर्चा चालू झाला आणि संपूर्ण गावातून पुन्हा स्टॅन्ड वरती आला. जनता आर्मीचे संस्थापक लखन सोरटे म्हणाले की परभणीतील संविधानाची विटंबना हे अतिशय निंदनीय आहे तसेच परभणीतील लाठी चार्ज मध्ये अनेक आंदोलकांना संविधान प्रेमींना लाठी चार्ज करण्यात आला. त्यामध्ये आंदोलक, पॅंथर सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी अटक केली आणि अमानुषपणे त्यांना मारहाण केली त्यातून त्यांचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे दिल्लीतील संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपमान जनक वक्तव्य केलं,अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे अशी सर्व बौद्ध समाज समाज व संविधान प्रेमींची मागणी आहे.तसेच विकास जी मोरे,अभिषेक मोरे,सचिन खिलारे,दयानंद कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून त्या ठिकाणी जाहीर निषेध केला.या वेळी महादेव साळवे प्रशांत साळवे,सचिन खिलारे,विकास मोरे,अरूण साळवे, महेंद्र साळवे,अनिल खिलारे,साया साळवे,प्रदीप मोरे,अभिषेक मोरे,रोहित साळवे,राहुल साळवे,किशोर साळवे, समाधान मोरे,किरण अवघडे, विपुल मोरे,कुमार अवघडे,अमोल खिलारे सर्व बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.नातेपुते पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अंमलदार माननीय जमादार साहेब यांचंही या ठिकाणी मोलाचा सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांचं व पोलीस प्रशासनाचे आभार.