Uncategorized
अजित दादा साठे यांच्या मागणीला यश
माळशिरस प्रतिनिधी
तहशिल कार्यालय माळशिरस येथे कन्हेर ता ( माळशिरस ) येथील विनापरवाना व बेकायदेशीर अनाधिकृत विटभट्यांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी यासाठी मातंग समाजाचे नेते अजितदादा साठे यांनी आंदोलन केले होते,सदर आंदोलनाची दखल घेत निवासी नायब तहसीलदार अमोल कदम यांनी अनाधिकृत सुरु असलेल्या विटभट्यांचा पंचनामा करुन त्यांना नोटीस बजावली आहे, आंदोलन प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चालक मालक तालुकाध्यक्ष संजय पवळ, क्रांतीकारी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले आदींनी पाठिंबा दिला,तसेच एका महिन्याच्या आत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे अशयाचे पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.